गावाविषयी माहिती

हिरवे-घाणवळ  हे महाराष्ट्र राज्यातील पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील एक प्रगतशील गाव आहे. २०११ च्या जनगणनेनुसार या गावाची लोकसंख्या सुमारे ३१९९ आहे. गावामध्ये शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा हिरवे, शासकीय माध्यमिक आश्रम शाळा घाणवळ (स्थलांतरित गोंदे) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा , अंगणवाडी केंद्रे १० अशी शैक्षणिक व शारीरिक सुविधा उपलब्ध आहेत. तसेच मंदिरे, सामुदायिक सभागृह, पाणीसाठवण, सार्वजनिक विहिरी,बंधारे व शेततळी अशा धार्मिक व सामाजिक सुविधा देखील आहेत.

गावातील बहुतांश लोकांचा मुख्य व्यवसाय शेती असून भात, नागली, उडीद व वरई ही प्रमुख पिके घेतली जातात. भात व वरई या पिकांच्या लागवडीमुळे गावातील शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळते.

हिरवे-घाणवळ  ग्रामपंचायतीत विविध शासकीय योजना प्रभावीपणे राबविल्या गेल्या आहेत. घरकुल योजना अंतर्गत शेकडो घरांना लाभ मिळाला आहे. रोहयो अंतर्गत गावातीत्ल हद्दीतील शिवार रस्ते खडीकरण,मजबुतीकरण,तसेच वयक्तिक फळबाग लागवड मोठ्या प्रमाणात झालेल्या आहेत .स्वच्छ भारत अभियान अंतर्गत हिरवे-घाणवळ  गावाने संपूर्ण खुले शौचमुक्त (ODF) दर्जा मिळवला आहे. जल जीवन मिशन अंतर्गत नवीन  पाणीपुरवठा योजना गावात पाणीपुरवठा नियमित करण्यात आला आहे त्यामुळे १२ महिने गावाला मुबलक पाणीपुरवठा उपलब्ध होतो.

ग्रामपंचायत हिरवे-घाणवळ येथे सध्या लोकनियुक्त सरपंच श्री. हिरामण नारायण पाटील असून सर्व नागरिकांना विश्वासात घेऊन गावाचा  विकास घडवून आणतात त्यामुळे  ग्रामपंचायतीचे निर्णय लोकसहभागातून घेतले जातात.

हिरवे-घाणवळ गाव आज मोखाडा तालुक्यातील एक आदर्श  सर्वांगीण विकासाकडे वाटचाल करणारे गाव म्हणून ओळखले जाते.

भौगोलिक स्थान

हिरवे-घाणवळ  हे गाव मोखाडा तालुक्याच्या ठिकाणापासून सुमारे १५ कि.मीअंतरावर वसलेले आहे. गावाचे एकूण क्षेत्रफळ.      हेक्टर  असून ग्रामपंचायतीमध्ये  वार्ड आहेत. एकूण ११९० कुटुंबे येथे वास्तव्यास असून, लोकसंख्या ३१९९ आहे. त्यामध्ये १५३४ पुरुष व १६६५ महिला यांचा समावेश होतो.

गावाचा भौगोलिक विस्तार प्रामुख्याने सपाट प्रदेशात असून शेतीयोग्य जमीन मोठ्या प्रमाणात आहे. गावात साठवण बंधारे असल्या मुळे पिकांना मुबलक पाणीपुरवठा होतो. येथे हवामान उष्णकटिबंधीय आहे; उन्हाळ्यात तापमान साधारणतः ४४°से. पर्यंत जाते, तर हिवाळ्यात °से. पर्यंत खाली येते. पावसाळ्यात सरासरी १२१५० ते १६५० से.मी. पर्जन्यवृष्टी होते.

हिरवे-घाणवळ गाव भात  उत्पादनासाठी प्रसिद्ध असून परिसरात पाणलोट क्षेत्राचा विकास झाल्यामुळे जलसंधारणाची चांगली सोय आहे.

लोकजीवन

हिरवे-घाणवळ  गावाचे लोकजीवन साधे, श्रमप्रधान व पारंपरिक आहे. शेती हा येथील मुख्य व्यवसाय असून भात, उडीद, आंबे, काजू, फणस, चिकू, भुईमग, काही प्रमानात फुलशेती मध्ये मोगरा, सिनचाफा, झेंडू व हंगामी भाजीपाला पिके मोठ्या प्रमाणावर घेतली जातात. शेतीसह काही लोक दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन व लघुउद्योग यामध्येही कार्यरत आहेत.

गावात विविध सामाजिकसांस्कृतिक  धार्मिक परंपरा जोपासल्या जातात. वर्षभरात होणारे उत्सव, सण आणि गावात भरवला जाणारा साप्ताह गावाच्या एकतेचे दर्शन घडवतो. गणेशोत्सव, होळी, दिवाळी, नवरात्र तसेच स्थानिक देवतांच्या पूजांना विशेष महत्त्व आहे.

येथील लोक मेहनती, मदतशील व अतिथी देवो भव या विचाराने वावरणारे आहेत. स्त्रियांचा सहभाग ग्रामविकास  स्वयंसाहाय्य गटांद्वारे मोठ्या प्रमाणात दिसून येतो. तरुण वर्ग शिक्षण, खेळ आणि रोजगाराच्या संधी शोधत प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे.

हिरवे-घाणवळ लोकजीवनात पारंपरिक ग्रामीण संस्कृतीसोबतच आधुनिकतेची झलकही दिसते, ज्यामुळे गावाचा विकास आणि एकात्मता दोन्ही जोपासले जातात.

लोकसंख्या

लिंग संख्या
पुरुष १५३४
स्त्रिया १६६५
एकूण ३१९९

संस्कृती व परंपरा

हिरवे-घाणवळ  गावाचे सांस्कृतिक जीवन समृद्ध आणि विविधतेने नटलेले आहे. येथे वर्षभर विविध धार्मिकसामाजिक  सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. गावातील प्रमुख देवतांच्या पूजाअर्चा व साप्ताह, गावदेवी बोहडा हा अक्षय तृतीय पासून पुढील ५ दिवस आदिवासी संस्कृती जपणारा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो  यामुळे ग्रामस्थांमध्ये एकोपा आणि श्रद्धेची भावना दृढ होते.

गणेशोत्सवनवरात्रदिवाळीहोळी यांसारखे सण गावात उत्साहाने साजरे केले जातात. या सणांमुळे गावातील मुलं, तरुण व वयोवृद्ध सर्वच वयोगट एकत्र येऊन आनंदोत्सव साजरा करतात.

गावात लोककलाकीर्तनभजन आणि पारंपरिक खेळ यांचा विशेष प्रभाव दिसून येतो. पिढ्यान्पिढ्या चालत आलेल्या परंपरा जपतानाच नवीन पिढी आधुनिकतेशी जुळवून घेते.

स्त्रियांचा सहभाग ग्रामविकासात तसेच सांस्कृतिक उपक्रमांमध्ये मोठ्या प्रमाणावर असतो. स्वयंसहाय्य गटांद्वारे महिला सामाजिक व आर्थिक प्रगतीत योगदान देतात.

यामुळे हिरवे-घाणवळ गावाचे लोकजीवन परंपरा आणि आधुनिकता यांचा सुंदर संगम साधत आजही एकात्मतेने टिकून आहे.

प्रेक्षणीय स्थळे

  • गावदेवी मंदिर – गावातील देवतेचे गावदेवी मंदीर जांभूळमाथा येथे असून, मारुती मंदिर, श्री कृष्ण मंदिर हे गावकऱ्यांचे श्रद्धास्थान असून येथे दरवर्षी साप्ताहासारखे धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात.
  • हनुमान मंदिर –  घाणवळ गावाच्या मध्यवर्ती भागात असलेले हे मंदिर उत्सव व सणासुदीला ग्रामस्थांच्या भेटीगाठींचे केंद्र असते.
  • शेती क्षेत्र  मोगरा बागा – हिरवे-घाणवळ भात व वरई उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. गावातील हिरवीगार शेते, आंबे आणि मोगरा शेती पाहण्याजोगी आहे.

जवळची गावे

हिरवे-घाणवळ  गाव मोखाडा तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाणी असल्यामुळे आजूबाजूला अनेक गावे आहेत. ही गावे हिरवे-घाणवळ  सामाजिक, शैक्षणिक, व्यावसायिक व सांस्कृतिकदृष्ट्या जोडलेली आहेत.

मोखाडा, बेरीसते, दांडवळ, कळमगाव,  ही हिरवे-घाणवळ च्या आसपासची प्रमुख गावे आहेत.